पक्षाचे चिन्ह हातून गेल्यानंतर ठाकरे गट अधिक आक्रमक झाला आहे. आता ठाकरे गटाकडून थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यात धडक दिली जाणार आहे. विदर्भात ठाकरे गटाची पडझड रोखण्यासाठी शिवसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. ठाकरे गट 25 फेब्रुवारीपासून विदर्भात शिवसंवाद यात्रेचे आयोजन करणार आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा जिल्ह्यात शिवसंवाद यात्रेच्या निमित्तानं नागरिकांसोबत संवाद साधला जाणार आहे.
#UddhavThackerey #Shivsena #DevendraFadnavis #BJP #SanjayRaut #BalasahebThackerey #EknathShinde #Maharashtra #hwnewsmarathi